निगडी मध्ये 52 लाखांची घरफोडी

0
81
crime

निगडी, दि. 20 (प्रतिनिधी)

निगडी प्राधिकरण परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून 52 लाख तीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पावणे आठ ते सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडली.

रोहित सतीश कुच्छल (वय 35, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथे फिर्यादी यांचे घराच्या तळमजल्यावर दुकान आहे शुक्रवारी सायंकाळी त्यांनी दुकान बंद केले आणि ते कुटुंबासमवेत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. त्यांचे घर दुकानाच्या वरील बाजूला आहे. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख रुपये रोख रक्कम, 110 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 6 किलो चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, एक कॅमेरा, हातातील दहा घड्याळे असा लोखंडी तिजोरीसह एकूण 52 लाख तीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.