निगडी मध्ये दुचाकी पेटवली

0
20

निगडी दि. 6 (पीसीबी) – निगडी मधील ओटास्कीम येथे तिघांनी मिळून एक दुचाकी पेटवली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. ५) पहाटे घडली.

अरुण मसाजी कांबळे (वय ५२, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम दत्तात्रय गुडेकर (वय २०), अनिकेत माने (वय २२), सुरज जोगदंड (वय २३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी त्यांची दुचाकी (एमएच १४/एलके ८४१९) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. रविवारी पहाटे आरोपींनी दुचाकीला आग लागली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.