निगडी मध्ये तरुणावर कोयत्याने वार

0
56

निगडी, दि. 02 (पीसीबी) : निगडी मधील साईनाथनगर येथे तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास अण्णाभाऊ साठे क्रीडा मैदानावर घडली.

ओंकार नवनाथ आरवडे (वय 24, रा. कृष्णानगर, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन दादासाहेब साळुंखे (वय 19, रा. साईनाथनगर, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे त्यांचा मित्र यश पोतदार याच्यासोबत अण्णाभाऊ साठे क्रीडा मैदान साईनाथनगर येथे चेष्टा मस्करी करत थांबले होते. त्यावेळी आरोपी सचिन साळुंखे तिथे आला. त्याने माझ्या मित्राची चेष्टा मस्करी का करतो असे म्हणत ओंकार यांना मारहाण केली. त्यानंतर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने ओंकार यांच्या डोक्यात वार करत त्यांना गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.