निगडी भुयारी मार्ग दारुड्यांचा अड्डा,… आंदोलनाचा शर्मिला बाबर यांचा इशारा

0
5

दि.20 (पीसीबी) – पुणे मुंबई जुना हायवे वर निगडी येथे नुकतेच बांधलेल्या भुयारी मार्गाचे फायदे कमी आणि तोटे जास्त झालेले आहेत. हा भुयारी मार्ग दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे. भुयारी मार्गाच्या जवळच ०३ दारूची दुकाने आहेत. त्यामुळे सदर भुयारी मार्गाचा नागरिक कमी आणि दारुडे लोकच जास्त वापरक करत आहेत, तिथेच दारू पितात, तिथेच झोपतात, तिथेच उलट्या करतात, त्यामुळे त्या भुयारी मार्गाचा वापर करणे नागरिकांना नकोसे झाले आहे. जेष्ठ नागरिक, महिला, लहान विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच त्या रस्त्याची भीती वाटू लागलेली आहे. आणि तिथे असलेला सुरक्षा रक्षक असून सुद्धा नसल्यासारखा आहे. तो कधीच जागेवर नसतो, कधीच वर्दीवर नसतो, त्यालाच भीती वाटत आहे तिथे काम करण्याची असला तो सुरक्षारक्षक. भुयारी मार्गाचे एक तर सगळे प्रश्न सोडवा अन्यथा तो मार्ग बंद करून टाका नाहीतर आम्ही सर्व व्यापारी संघटनेचे नागरिक तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी दिला आहे.