निगडी प्राधिकरणात साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

0
357

निगडी, दि. ३० (पीसीबी) – निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीनिमित्त अयोद्धेतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. अत्यंत कलात्मक पद्धतीने उभारलेला देखावा प्राधिकरणातील जलतरण तलावाशेजारी आहे.

मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या संकल्पनेतून देखावा साकारला असून, तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. नवरात्रीच्या दहा दिवसांत देवीची आराधना, नित्य आरती, पूजा, भजन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मागील दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांमुळे सर्व प्रकारचे सण, उत्सवांच्या साजरे करण्यावर बंधने होती. पण यंदा करोना थोडा आटोक्यात आला असल्याने नागरिक उत्साहाने सण साजरे करत आहेत. त्यामुळे यंदा श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने हा देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी अवश्य यावे असे भाविक भक्तांना आवाहन केले आहे.

अत्यंत आश्वासक अशी ही तुळजाभवानी देवीची मूर्ती असून भक्तांच्या रक्षणासाठी सदैव धावून येणाऱ्या या जगत जननीचे हे देखणे आणि सुंदर रुप डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. नवरात्रीच्या दहा दिवसांत देवीची प्रार्थना, पूजन करुन तिची करुणा आपल्यावर सदैव राहावी यासाठी प्रत्येकजण मनोभावे पूजा, अर्चना करत असतो. आपल्या मनीचे गुज या तुळजाभवानी आईसमोर मांडण्यासाठी येथे भक्तांची रीघ लागलेली असते.

यंदा मंडळाने पंधरा वर्षे पूर्ण करुन सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन देखील होणार आहे. त्यावेळी देखील आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.