निगडीपर्यंत मेट्रो, मोरवाडी चौकात सामाजिक संस्थांच्या वतीने आनंदोत्सव

0
311

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) -गेल्या 6 वर्षापासून फुगेवाडी ते पिंपरी ऐवजी फुगेवाडी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात यावी, यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने लोकचळवळ उभारण्यात आली होती. या चळवळीच्या मागणीला यश आल्याने आज सकाळी 11.30 वाजता मोरवाडी चौकात सर्व सामाजिक संस्थां व नागरिकांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मेट्रोचे जाळे निगडी पर्यंत विस्तारित करावे यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मानवी साखळी रचून उपोषण करण्यात आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना वेळोवेळी निवेदन दिले.
विविध पातळीवर याबाबत पाठपुरावा देखील करण्यात आला होता. या लोकचळवळीला शहरातील विविध राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधींनी पाठींबाही दर्शविला होता.

निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषयाला काल केंद्र सरकारने मान्यता दिल्याने शहरातील लोकांच्या एकतेचा विजय झाला आहे. त्यामुळे आज सर्व सामाजिक संस्थां व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पिंपरी चिचवड सिटिझन फोरम चे अध्यक्ष तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.