निगडीत महारुद्र हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा

0
1190

-विलासनगर युवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

निगडी दि.२० (पीसीबी)- निगडीतील विलासनगर सेक्टर २२ येथे शनिवारी महारुद्र हनुमान मंदिराचा लोकार्पण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन विलासनगर युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहेत.

शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजल्यापासुन धार्मिक कार्यक्रम, सकाळी ११ वाजता महारुद्र हनुमान मुर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे, दुपारी १ नंतर गणेश पुजन, पुण्याह वाचन, मुर्ती धाण्याधिवास, देवता स्थापन, जलाधिवास कुटीर होम, मुर्ती अभिषेक व मुर्ती प्राणप्रतिष्ठा असे धार्मिक विधी वेदमुर्ती विवेक कुलकर्णी गुरुजी (आचार्य), दिपक कुलकर्णी गुरुजी हे करणार असुन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सदर कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती विलासनगर युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.