निगडीत क्रांतिवीर मित्र मंडळाच्या दांडिया -गरबा जोरात – आयोजक प्रा. उत्तम केंदळे

0
360

निगडीत विजयादशमीला रावणदहण – आयोजक प्रा. उत्तम केंदळे

निगडी, दि. २२ (पीसीबी) – निगडीत क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दांडीया भरविण्यात येत आहेत. बेस्ट दांडिया डान्सर पुरुष, महिला यांना विविधे बक्षीसे दिली जात आहेत. दररोज विजेत्या महिलेला कीर्ती ज्वेलर्स यांच्या वतीने सोन्याची नथ दिली जात असल्याचे आयोजक प्रा. उत्तम केंदळे यांनी सांगितले.

मंडळ मागील 21 वर्षांपासून नवरात्र उत्सव आयोजित करत आहे. नवरात्र उत्सवाची कायम शोभा वाढत आहे. नवरात्र उत्सवात भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन केले जाते.

आत्तापर्यंत प्रदर्शित होणाऱ्या श्यामची आई गौरी देशपांडे,बालकलाकार श्रव गाडगीळ तसेच बॉईज 4 चित्रपटातील अनेक अभिनेते यांनी नवरात्री निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत

24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता यमुनानगर येथील ठाकरे मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.

मंडळाचे संस्थापक इरफान सय्यद, प्रेरणास्थान डिगा उदयकुमार, उत्सवप्रमुख श्रीकांत सुतार आहेत. कार्याध्यक्ष भिमाजी पानमंद, अक्षय खोत, रूपल माने, उमेश घोडेकर, कौस्तुभ देशपांडे, प्रभू बालचंद्रन, सचिन पिंजण, किरण घोटाळे, परेश पटेल,प्रशांत तरटे,स्वप्नील लोंढे,आकाश जाधव,प्रशांत केंदळे,संकेत जुनघरे,वेदांग देशमाने,ऋषिकेश महामुनी, निखिल पवार,निलेश आकारशे,कुणाल काळे, आकाश गाडे,विशाल केंदळे, पंकज साबळे,अविष्कार काळे,ओंकार खडके आणि असे अनेक कार्यकर्ते दांडिया स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परीश्रम करत आहेत.