निखील वागळेंसह २०० जणांवर गुन्हा

0
168

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पत्रकार निखील वागळे यांच्यावर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला होता. निर्भय बनो सभेला जात असताना वागळे यांच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच याप्रकरणी निखील वागळे यांच्यासह निर्भय बनो सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील वागळे यांची गाडी फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. दुसरा गुन्हा २०० ते २५० लोकांवर दाखल करण्यात आला आहे. यात महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते, निखील वागळे आणि निर्भय बनो सभेचे आयोजक यांचा यात समावेश आहे. सभेच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. तरी देखील हे सर्व त्याठिकाणी जमा झाले होते. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात निखील वागळेंच्या गाडीची तोडफोड झाली. अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. तसेच निर्भय बनो कार्यक्रम स्थळी दगडफेक देखील करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी रात्री पुण्यातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. वागळेंना पोलिसांनी सभा न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, वागळे सभा घेण्यावर ठाम होते. हल्ला झाल्यानंतर निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यलयात सभा घेतली.