निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस

0
158

दि.8 ऑगस्ट (पीसीबी) – नवीन पर्वाला सुरुवात झाली असून हा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासह घरातील अनेकांशी पंगा घेतल्यामुळे ती चर्चेत होती. मात्र, आता तिच्या चर्चेत येण्याचा कारण काही वेगळं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीनं छोटा पुढारीला किस केलं आहे. याचा प्रोमो आऊट झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बिग बॉसचा नवा प्रोमो आऊट झाला असून यामध्ये निक्की तांबोळी आणि धनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी यांची मैत्री बहरताना दिसत आहे. यामध्ये धनश्याम निक्कीला बोलतो की, तू माझ्यासोबत कसंही वाग पण मी तुझ्यासोबतच प्रेमानेच वागणार. या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर निक्की तांबोळी घनश्यामला गालावर किस करतानाही दिसत आहे. यानंतर घनश्याम मात्र लाजेने लाले-लाल झाल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात बाई-बाई करणाऱ्या निक्की ताईनेच घनश्यामला किस केल्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.