नाशिक फाटा ते मोशीपर्यंतच्या टप्प्यात मेट्रो मार्ग विकसित करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाची तत्वत: मंजुरी

0
239

पिंपरी, दि.26 (पीसीबी) पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंतच्या टप्प्यात मेट्रो मार्ग विकसित करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. हिंजवडी ते चाकण मार्गावर मेट्रो विस्तार व्हावा. या करिता गेल्या ३ वर्षांपासून तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत मेट्रो विस्ताराचा विकास आराखडा तयार करण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला होता. यावर महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारनेही मेट्रो विस्ताराबाबत अनुकूलता दर्शवली.

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या अधिकारातील विभागाने सकारात्मक भूमिका घेतली. शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे.