नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…; राऊतांकडून CM शिंदेंचा व्हिडिओ ट्वीट

0
118

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला.

दि१३ मे (पीसीबी ) – नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…; राऊतांकडून CM शिंदेंचा व्हिडिओ ट्विट
राज्यातील विविध भागात भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या २ तासांच्या दौऱ्यासाठी जड बॅगा आणल्या आहेत. त्यामुळे या बॅगातून कोणता माल नाशिकला पोहोचला? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत आहेत. संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, नाशिकमध्ये रात्रीचे खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचवला? निवडणूक आयोग फालूत नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.