नाशिकचे साकेत गोखले प.बंगालमध्ये तृणमूलचे राज्यसभा खासदार

0
255

नाशिक, दि. १८ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे साकेत गोखले यांची आज (ता.१७ जुलै) राज्यसभेवर विनविरोध निवड झाली. इकडे हजारो किलोमीटर दूर पंचवटीत राहणाऱ्या पित्याला खासदाराचा बाप झाल्याच्या अप्रूपने ऊर भरून आला. सोबतच नाशिकचा आणखी एक खासदार झाल्याचा इतिहास घडला.

खासदार साकेत यांचे वडील सुहास गोखले यांनी भावना व्यक्त करतांना आयुष्यभर राजकारणापासून दूर राहिलो. मात्र, मुलगा मात्र खासदार झाल्याचे अप्रूप असल्याचे सांगितले. या घटनेच्या निमित्ताने नाशिकचा युवक राज्यसभेत पश्चिम बंगालच्या कोट्यातून खासदार झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे साकेत हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. ठाण्यात माहिती आधिकार कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या साकेत यांना तृणमुलने पक्षात काम करण्याची संधी दिली होती.
त्या संधीचे सोने करत साकेत यांनी झोकून देउन पक्षाचे काम केल्याच्या बदल्यात त्यांना तृणमृल काँग्रेस(Trunmul Congress)ने राज्यसभेवर पाठविले. गोखले यांचे कुटूंब मूळ नाशिकचे आहे. पंचवटीत कपालेश्वर मंदिरामागे खांदवे सभागृहाजवळ त्याचे वडील सुहास गोखले रहायला आहे. मूळ नाशिककरअसलेल्या साकेत गोखले यांच्या आजी आणि आजोबा हे दोघेही जु. स. रुंग्ठा विद्यालयात शिक्षक होते. तर वडील आणि काका नंदू गोखले हे दोघे पोलीस खात्यात आधिकारी होते.

सुहास गोखले यांचे पुत्र साकेत यांचे शिक्षण मुंबईत विल्सन कॉलेजला झाले. तेथेच माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून ते नावारुपाला आले. तर मुलगी अमेरिकेत डॉक्टरेक्ट करते. मुलाने जे काही मिळविले ते पुर्णपणे त्याच्या स्वता: च्या हिमतीवर मिळविले आहे. मला त्याचे अप्रूप आहे. राजकारणा(Politics)पासून तर मी खूप अलिप्त राहिलो आहे. पण नेमक्या त्याच क्षेत्रात मुलगा खासदार झाल्याचे अप्रूप आहे सुहास गोखले यांनी सांगितले.

सकाळीच साकेत यांचा दूरध्वनी आला. बाबा मी खासदार झाल्याचे सांगितले. आयुष्यभर मी ज्या राजकारणापासून एकदम दूर आणि अलिप्त राहिलो त्याच क्षेत्रात मुलगा खासदार झाला. मी खासदारा(MP)चा बाप झाल्याचे अप्रूप वाटले. अधिवेशन असल्याने जावे लागेल. मात्र, त्याअगोदर नाशिकला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे साकेत यांचे वडील सुहास गोखले यांनी सांगितले.