नाशकात ८५० कोटींचे बेहिशेबी व्यवहार, सोनं, चांदी, रोकड असे घबाड…

0
146

नाशिक, दि. ५ (पीसीबी) : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 850 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कधी कर्मचाऱ्यांच्या घरी… काहींच्या कार मधून रोकड जप्त
आयकर विभागाच्या छापामारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत, काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी तर काहींच्या कार मधून रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पुढील तपासात आणखी काय बाहेर येते? याकडं लक्ष लागलं आहे.