ब्रिटन, दि. ७ (पीसीबी) – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत आलं आहे. ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
बोरिस जॉन्सन सरकारमधील विद्यमान मंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी नाधिम झहावी यांची ब्रिटनचे नवीन अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला.
अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत. तसेच सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा रिचमंड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून आले होते. सुनक २०१७ मध्ये पुन्हा निवडून आले होते. सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्तीशी झाले आहे.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे रहिवासी आहेत. सध्या ते ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते ब्रिटनमधील रहिवासी असले तरीही त्यांची पाळंमुळं मात्र भारताशी जोडली गेली आहेत. सध्याच्या घडीला सुनक यांच्या कामानं अनेकजण प्रभावित असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्यांना पंतप्रधानपदासाठीचा प्रबळ दावेदारही मानलं जात आहे.