नारायण तातू राणे आणि त्यांची दोन नेपाळी मुले…

0
283

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशी चर्चा रंगली होती. आता नाराणय राणे यांच्या टीकेला संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेय, त्याशिवाय त्यांच्या मुलावरही निशाणा साधलाय.
काही दिवसांपूर्वी येथे नारायण तातू राणे आले होते. येथे जोरदार भाषण केले, माझ्याविरोधात शिवीगाळ केली, गुन्हा दाखल केला का? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. गुन्हा दाखल केला ? मंत्री आहे म्हणून कारवाई नाही का? भाजप आणि गद्दार गटाचे असे अनेक नेते शिव्या घालतात.. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. अटक नाही. पण दत्ता दळवी यांनी एक जनभावना व्यक्त केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे आणि तुम्हाला अटक होणार असे नारायण राणे म्हणतात…. त्यावर संजय राऊतांनी समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, नारायण तातू राणे 2024 मध्ये तुम्ही कुठे असाल, त्याचा विचार करुन ठेवा. नारायण तातू राणे आणि त्यांची दोन नेपाळी मुले खुलेआम शिव्या देतात.. कोणत्याही शब्दाचा वापर करतात. त्यांच्यावर कोणताही कारवाई नाही. आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली जाते. तुम्ही कितीही जुलूम करा, 2024 मध्ये जेलमध्ये जाणार, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी नालायक म्हटले त्यात चुकीचं काय आहे. नालायकला नालायक म्हणायचं नाहीतर काय? सरकार नालायक आहे, तर नालायकच म्हणणार.. देशात सेन्सारशीप लागली आहे का? नालायकला नालायक म्हणून शकत नाही, तर डिक्शनरीतून शब्द हटवा, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे गद्दार हृदयसम्राट मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री प्रचाराला बाहेर फिरतात. त्याच्यावर टीका होते. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली. आम्ही सर्व दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत, सर्वजण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतो.

गद्दार हृदय सम्राट स्वत:ला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात. हा वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी स्वत:ला लावून घेतात. त्यासंदर्भात दत्ता दळवी यांनी भाषणामध्ये शिवसैनिक म्हणून भाषण केले. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. त्यात काय चुकंच वापरलं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला. हा शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे.. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते?