नामर्द सारखा शब्द वापरुन यांच्याकडे अध्यात्मिक विचार नाही हे पुन्हा सिध्द

0
370

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आले. राज्य सरकारच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला“ नामर्द सारखा शब्द वापरुन यांच्याकडे अध्यात्मिक विचार नाही हे पुन्हा सिद्ध झालेच. परंतु पालघर साधुंच्या हत्येची चौकशी सीबीआय कडे सोपविण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन स्वतःच्याच सरकारला व गृहमंत्र्यांना असक्षम ठरवत आहोत हा सारासार विचार ही या महाविद्वानांकडे नाही. धन्य आहे!” असं सचिन सावंतांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तर, “जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते ‘हिंदूधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस’ यांनी करून दाखवलं! पालघर साधू हत्याकांडाची केस सीबीआयकडे वर्ग करून गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माबद्दल किती जागरूक आहेत. हे आज सगळ्या हिंदूंना समजलं. नाहीतर समस्त हिंदू समाजाचा तळतळाट भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची काय दुर्देशा झाली आहे हे आज सगळा देश पाहतोय.” अशा शब्दांमध्ये भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी टीका केली होती.

या घटनेनंतर आचार्य तुषार भोसलेंनी ही केस सीबीआयकडे द्या, ही मागणी सातत्याने केली होती आणि ठाकरे सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन देखील केले होते.