नाना काटे सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, १२ हजार गणेशमूर्तीचे संकलन

0
113

पिंपळे सौदागर, दि. १९ (पीसीबी) : पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले.

मागील ८ वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण १२ हजार ३०० मूर्ती दान करण्यात आल्या.