चिंचवडगाव, दि. १९ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे – पाटील यांच्याकडून चिंचवड येथील सफाई कामगार बंधू – भगिनींना छत्री वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्या प्रसंगी मार्गदर्शिका विमलताई जोशी, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे कार्याध्यक्ष श्री महेश बारसवडे, संदीप दळवी, रोहित गावडे, योगेश वाल्हेकर, निलेश दळवी, हेमा कस्तुरे, स्वाती चौधरी, शिल्पा डोंगरे, संदीप माने आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीचा वसा गेली अनेक वर्षे सुरू ठेवला आहे, तो यापुढेही कायम राहील. समाजातील तळागाळात काम कऱणाऱ्या घटकांची दखल घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक सेवा सुविधांसाठी आम्ही अखंड काम करत असल्याचे यावेळी आश्विनीताई चिंचवडे यांनी सांगितले. भाजपाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगरसवेक शंकरशेठ जगताप यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू असल्याचे चिंचवडे यांनी नमूद केले.