नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?

0
76

संगमनेर, दि. 26 (पीसीबी) : संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या सुकन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली, त्यानंतर फारच गदारोळ झाला. संगमनेरमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. एकंदरीतच वसंतरावांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. याबद्दल बोलताना जयश्री थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयश्री थोरात बोलताना म्हणाल्या की, जे काही काल घडलं ते कुणालाही न शोभणारं, अत्यंत वाईट आहे… जर महिलांनी राजकारणात यायचं असेल, तर असं बोलल्यास कोण येणार? मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल एवढं वाईट बोलले? जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? विरोधाला पण एक पातळी असते, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?”, असा सवाल जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे.

“मला सुजय विखेंना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही बसवलेले अध्यक्ष तिथे बोलतायत सुजय विखेंनीही चाकूर गावामधे माझ्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मला माहीत नाही की, सुजय विखे त्यांना भडकावतायत की काय? पण हे सगळं आम्ही गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहोत… आक्षेपार्ह विरोध केलेल्या देशमुख यांना अटक का केली नाही? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते चुकीचं आहे, असंही जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.

नेमकं घडलं काय?
जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण आहे. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप करण्यात आलाय.

धांदरफळ गाव बंद
शुक्रवारी धांदरफळ गावात झालेल्या घटनेनंतर काँग्रेस पाठोपाठ आता गाड्यांची तोडफोड व जाळपोळ विरोधात भाजप देखील आक्रमक होणार असून प्राणघातक हल्ल्या विरोधात लोणी गावात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे… यात सुजय विखे देखील सहभागी होतील. संगमनेरातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळाव्याचे बॅनर थोरातांच्या समर्थकांनी फाडले. धांदरफळ गाव बंद ठेऊन निषेध

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल
जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल