नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.5) अंबेठाण येथे घडला आहे.
मंगेश संतोष शिंदे (वय.19 रा. चासकमान), संदेश संतोष पोखरकर (वय 20 रा.चासकमान), किरण रविंद्र बारवेकर (वय 24 रा.चासकमान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि.6) ललन गिरिधारी सहानी (वय 45 रा. अंबेठाण) महाळुंगे एमआयडिसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोन वर बोलत असताना आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यदीचा 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावला. या वरून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.