नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून आमदार शंकर जगताप उतरले थेट रस्त्यावर!

0
4

आमदार जगताप यांनी मान्सूनपूर्व कामांची केली ‘ऑनफिल्ड’ पाहणी

चिंचवड, दि. २१ – पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील विविध ठिकाणी थेट पाहणी दौरा करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले. विविध भागांतील नाल्यांची सफाई, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण, पाण्याच्या निचऱ्याची अडचण आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या पाहता, त्यांनी संबंधित विभागांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

पुनावळे परिसरात तातडीचे उपाय

पुनावळे अंडरपास खाली रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचे तत्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. तसेच जलवाहिन्यांची स्वच्छता करून नवीन स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याची सूचना केली. भारत पेट्रोल पंपासमोरील पाण्याची साचलेली समस्या लक्षात घेऊन तिथेही स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचा निर्णय झाला. पुनावळे सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देशही देण्यात आले.

किवळे आणि समीर लॉन्स परिसरातील उपाययोजना

समीर लॉन्स अंडरपासजवळ जुन्या स्ट्रॉम वॉटर लाईनच्या अडथळ्यामुळे तिथे नवीन लाईन टाकण्याचे आदेश देण्यात आले. किवळे परिसरातील नाल्यांमध्ये अडलेल्या गाळाची सफाई करून स्क्रिनिंगचे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाला दिल्या.

वाहतूक नियोजन व स्मशानभूमीचे काम

मुकाई चौक ते वाकडदरम्यान होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, मुकाई चौकातून वाकडकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्याचे आदेश बीआरटीएस व स्थापत्य विभागाला देण्यात आले. तसेच वाल्हेकरवाडीतील स्मशानभूमीच्या अपूर्ण कामांची पाहणी करून ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सोसायट्यांमधील पाणी साचण्याच्या समस्यांवर उपाय

गोखले वृंदावन व शांतीवन सोसायटी समोरील स्ट्रॉम वॉटर लाईनमुळे एन्ट्री पॉइंटवर पाणी साचत असल्याने, तिथे रॅम्प तयार करण्याचे आदेश देण्यात आले. चापेकर चौक ते वाल्हेकरवाडी कॉर्नरपर्यंत स्ट्रॉम वॉटर लाईन टाकून नव्याने रस्ता तयार करण्याचे निर्देशही दिले. सिल्वर गार्डन सोसायटी परिसरात लाईन नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर तत्काळ उपाय करण्याचे आदेश देण्यात आले.

एनएचएआयच्या प्रलंबित कामांवरही सूचना

एनएचएआयमार्फत सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामांची पाहणी करताना आमदार जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करून पावसाचे पाणी नीट निचरा होईल, याची खात्री करण्याचे आदेश दिले.

या दौऱ्यात आमदार शंकर जगताप यांच्यासोबत नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या व पावसाआधी सर्व पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

दौऱ्यात सहभागी मान्यवर व पदाधिकारी

या दौऱ्यात माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका संगीताताई भोंडवे, अश्विनीताई चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्वर भोंडवे, हुशार भुजबळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सभापती भारतीताई विनोदे, मंडल अध्यक्ष सनी बारणे, मोहन राऊत, सचिन राऊत, नवनाथ ढवळे, श्यामराव वाल्हेकर, शेखर चिंचवडे, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, दादा तरस, राम वाकडकर, राहुल काटे, योगेश चिंचवडे, कुणाल भोंडवे, दिलीप राऊत, धर्मपाल तंतरपाळे, प्रदीप साळुंखे, नीलेश भोंडवे, एसीपी कसबे साहेब, NHAI चे कार्यकारी अधिकारी सुभाष गंटे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, राकेश कोळी, श्री. शिर्के, संकेत चिंचवडे, प्रवीण वाल्हेकर, अमेय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.