नांदेड चे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा

0
102

नांदेड, दि. २६ ऑगस्ट (पीसीबी) – : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण (वय-६४) यांचे आज पहाटे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसंच कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर चव्हाणांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते.

प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला ते डायलसिस करत असत. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमलं नव्हतं. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे.