नशेत बस चालवणाऱ्या दोन एसटी चालकांवर गुन्हा दाखल

0
106

दि २० मे (पीसीबी ) – एसटी बस चालविताना मादक द्रव्याचे सेवन केले. याप्रकरणी दोन चालकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी वाकड ब्रीज येथे घडली.

नंदकिशोर मारुती तिडम (वय 39) आणि विलास भाऊरावजी घोडाम (वय ४२, दोघेही रा. मु. पो. ता. चंदगड, जिल्‍हा कोल्‍हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दयानंद देविदास ढवळे (वय 56, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी रविवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर वाकड ब्रिज येथे थांबलेल्या कोल्हापूर डेपोच्या मुंबई ते चंदगड आराम बसवरील आरोपी चालकाने शासकीय कर्तव्य करीत असताना मादक द्रव्याचे सेवन केल्याचे दिसून आले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.