नशेची इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
60

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

चिखली, दि. 13 (प्रतिनिधी)

नशेसाठी वापरली जाणारी औषधी इंजेक्शन विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 32 हजार400 किमतीची मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन जप्त केली आहेत.

सुमित गणेश पिल्ले (वय 32, रा. संत तुकाराम नगर, नेवाळेवस्ती, चिखली आकुर्डीरोड, चिखली), कनिष्कराज ऊर्फ राणा अरुण सुरवसे (वय 21, रा. शरदनगर, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक चिखली परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, नेवाळेवस्ती चिखली येथील एच पी पेट्रोलपंपाजवळ दोन इसम दुचाकी मोटार सायकलवर थांबलेले असून त्यांच्याकडे नशेसाठी वापरली जाणारी औषधी इंजेक्शन आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

दोघांकडून 32 हजार 400 रुपये किमतीची मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन, दोन दुचाकी, दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 32 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, श्रीधन इचके, अजित रुपनवर, प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांनी केली आहे.