नव तंत्रज्ञान आत्मसात करा – अच्युत गोडबोले

0
4

पीसीसीओईआर मध्ये बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पिंपरी, पुणे दि . १२ ( पीसीबी ) या पुढील काळात विज्ञान तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने बदल होत आहे. अवघ्या काही महिन्यांत नव नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत; तरच भविष्यात आश्वासक प्रगती साध्य करता येईल. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विविध स्तरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केला पाहिजे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ तंत्रज्ञ, मार्गदर्शक, लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात बी. टेक. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात यावेळी अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. विजयकुमार जंगम शेट्टी, संग्राम निर्मळे, पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, विद्यार्थी, पालक, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी प्रथम वर्षात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या नंतरच्या सत्रात प्रा. विजयकुमार जंगम शेट्टी, संग्राम निर्मळे, माजी विद्यार्थीनी कविता बाळीवाडा, सुहानी चालमेती यांनीही मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्यपूर्ण ज्ञानार्जन, नवकल्पना आणि नैतिक मूल्ये जपली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश नव्हे तर समाजासाठी जबाबदार अभियंता होण्याचे आवाहन केले, डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध अभ्यास, कौशल्य विकास, करिअरच्या संधींबाबत प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी मार्गदर्शन केले.
पालकांसाठी विशेष संवाद सत्रही आयोजित करण्यात आले.
स्वागत प्रा. शीतल पाटील आणि आभार प्रा. प्रिया ओघे मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.