नव्या कोऱ्या क्रेडीट कार्डमुळे तरुणीला 80 हजारांचा गंडा

0
126

नवीन क्रेडीट कार्ड घेतल्यानंतर तरुणीला त्याचा पासवर्ड सेट करण्यासाठी एका अनोळखी महिलेचा फोन आला. फोनवरील महिलेने गोपनीय माहिती घेत तरुणीच्या क्रेडीट कार्डमधून 80 हजार 780 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 5 मे रोजी दुपारी लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने एचडीएफसी बँकेचे नवीन क्रेडीट कार्ड घेतले होते. त्या कार्डचा पासवर्ड सेट करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी महिलेचा फिर्यादीस फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या महिलेने तरुणीला मोबाईलवर एक कोड टाईप करण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने कोड टाईप केला असता फोनवरील महिलेने तरुणीच्या क्रेडीट कार्ड मधून 80 हजार 780 रुपये काढून घेत फसवणूक केली. हे पैसे locon solution pvt Gurgaon या बँक खात्यावर गेले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.