मुंबई, दि.02 (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर, महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरु करण्यात येत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानं आज काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. तर, काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
सचिनद्र प्रताप सिंह यांची आयुक्त,शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आलीय.
रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणन कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्यांक विभास विभाग, मंत्रालय मुंबईचे सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
रविंद्र बिनवडे हे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुंद्राक शुल्क,पुणे या पदावर काम करतील.
रणजितसिंह देओल यांची प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.अशोक करंजकर,व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.प्रशांत नारनवरे यांची सचिव व विशेष चौकशी अधिकारी (२),सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभाग, पुणे चे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सूरज मांढरे यांची आयुक्त कृषी ,पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
प्रदीप पी. यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
माणिक गुरसाळ यांना सध्याच्याच पदावर ते पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करुन पुढे ठेवण्यात आलं आहे. माणिक गुरसाळ यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सोनिया सेठी सध्या महसूल व वन विभाग, मंत्रालय येथे प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन ) म्हणून कार्यरत आहेत त्यांना अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
आयएएस अधिकरी निधी चौधरी यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियान, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.
शीतल तेली-उगले, सोलापूर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त पदावर वेतनश्रेणी उन्नत करुन पदोन्नती देण्यात आली आहे.