नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे समग्र विकास – राज्यपाल राजेंद्रजी अर्लेकर

0
2
  • विद्याभारती पुणे शिक्षा पुरस्कार सोहळा उत्साहात
  • शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

चिंचवड दि . १२ ( पीसीबी )
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी महत्वपूर्ण असून सर्व शैक्षणिक संस्थांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अभ्यासून ते सर्वांपर्यंत पोहचवले पाहिजे, हे धोरण शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा, विश्वास निर्माण करणारे व मातीशी जोडणारे असल्याचा विश्वास केरळचे राज्यपाल राजेंद्रजी अर्लेकर यांनी व्यक्त केला ते विद्या भारती संस्थेतर्फे आयोजित पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार सोहळ्यात निगडी प्राधिकरण येथील ग. दि.माडगूळकर सभागृहात बोलत होते यावेळी व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठ निवृत्त शास्त्रज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक डॉ.नानासाहेब जाधव, पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, विद्या भारती प्रांत मंत्री रघुनाथ देवीकर, विद्या भारती जिल्हाध्यक्ष डॉ.अशोक नगरकर, जिल्हा मंत्री प्रवीण पोळ, उपाध्यक्ष अश्विनी गोरखे यांचेसह स्वागत समितीतील एस.बी.पाटील, डॉ. डी. के.भोसले, मनोज देवळेकर,डॉ.अश्विनी कुलकर्णी, विश्वनाथ नायर, डॉ.निवेदिता एकबोटे, ऍड.राजेंद्रकुमार मुथा,ऍड.एस.के.जैन प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना अर्लेकर यांनी भारतीय शिक्षण पद्धतीचे महत्व सांगून विद्येच्या प्रतिनिधींचा सत्कार सोहळा म्हणजे सत्कार्याचा सत्कार समारंभ असल्याचे गौरवोद्गार काढले. विद्या भारती संस्थेतर्फे भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षण, संस्कृती यासोबतच समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले जात असल्याचे देखील सांगून मूळ शिक्षणासोबतच कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांची भविष्यातील यशस्वी वाटचाल लक्षात घेता सर्वांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याकरिता शैक्षणिक राष्ट्रकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उपक्रमशील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, श्री जैन विद्या प्रसारक संचालित ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवड, प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय,क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सिटी प्राइड शाळा, एस.एन.बी.पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एस.एस. पी. एज्युकेशन सोसायटी, सरस्वती विश्व विद्यालय, नॅशनल स्कूल समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई, नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे, भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुल बारामती, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ या संस्थांसह आ.शंकर जगताप, नंदकुमार ठाकूर, शिवलिंग ढवळेश्वर, गुरुराज चरंतीमठ, प्रतापराव जाधव, डॉ.माधव सानप, स्वप्नील शेडगे, स्वामीनी प्राणा, राजेश नांबियार यांचा गौरव करण्यात आला यावेळी एस. के. जैन, रघुनाथ देवीकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रवीण पोळ यांनी विद्या भारती संस्थेची माहिती सांगून संस्थेतर्फे उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, सूत्रसंचालन डॉ.प्रविण कोठावदे,सुजाता कुलकर्णी तर आभार पंकज दलालांनी मानले.
सुरुवातीला भारतमाता, सरस्वतीपूजन दीपप्रज्वलन होऊन सायली काणे यांच्या कलाश्री नृत्य शाळेतर्फे नृत्य सादरीकरण करण्यात आले दिपाली शिंदे यांनी सप्तशती संगम संमेलन माहिती दिली, राष्ट्रगीत वंदे मातरम् किरण बेंद्रे,
प्रज्ञा फुलपगार यांनी गायले.
कार्यक्रमाला शहरातील मोठ्या संख्येने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.