नवी सांगवी, पिंपळेगुरवला मोकाट जनावरांचा सुळसुळाट, बंदोबस्त करण्याची मागणी

0
275

नवी सांगवी, दि. १३ (पीसीबी) – पिंपळेगुरव, नवी सांगवीत मोकाट  जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली आसतात. किंवा बिनधास्त पणे उभी आसतात. त्यामध्ये वळू पण आसतात. महापालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू आहे. अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे रस्ते निसरडे होतात. नागरिक आपल्या व्यवसायाठी व नोकरीसाठी किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. नागरिकांना व वाहनांनाही ही मोकाट जनावरे घाबरत नाहीत. नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी अंगावर ही धावून येतात. वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. मोकाट जनावरांचा धोका वाहनचालकांबरोबरच जेष्ट नागरिक,महीला व लहान मुलांनाही आहे. अनेक ठिकाणी सकाळ संध्याकाळ,मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी असतात.

यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले कि, महापालिकेने अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरीकांची सुटका करावी. पोलिसांनी पण अशा मोकाट जनावरांच्या मालकाला जबाबदार धरावे. बरेच गोठा मालकाकडे चाऱ्याची सोय नसल्याने मोकाट जनावरे मोकळे सोडतात.
बहुतांश गोशाळामध्ये मर्यादेपेक्षा आधिक जनावरे असतात.