नवी दिशा नवा विचार संकल्पनेतील संभाजी ब्रिगेडचे २७ वे राज्य अधिवेशन.

0
144

२२ ऑगस्टला होणार मुंबई वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन.

१३ ऑगस्ट (पीसीबी) – संभाजी ब्रिगेडने इतिहास,सांस्कृतिक,अर्थकरण,सामाजिक इत्यादी विषयावर गेली सत्तावीस वर्षे सातत्याने काम केल्यामुळे निश्चितच समाजात सकारात्मक बदल घडून आले आहेत.या परिवर्तनाचा मागोवा भविष्याचा वेध घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे २७ वे राज्यस्तरीय अधिवेशन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धी पत्रकावर जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते शहराध्यक्ष सतिश काळे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव जिल्हा सचिव लहू लांडगे शहर कार्याध्यक्ष दिनेश मराठे, रावसाहेब गंगाधरे,उपाध्यक्ष नकुल भोईर संघटक ज्ञानेश्वर लोभे,यांच्या सह्या आहेत.या अधिवेशनाच्या उद्घाटना वेळी सुप्रसिद्ध शिवशाहीर राजेंद्र कडूसकर यांचा शाहीरी जलसा सादर होऊन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार सह्याद्री देवराईचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे अभिनेते निखिल चव्हाण अभिनेते गौरव मोरे यांची उद्घाटनपर मनोगत होणार आहेत.दुपारी बारा ते एक वाजता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या नवी दिशा नवा विचार या संकल्पनेतून उद्योगाची दूरदृष्टी गोष्ट पैश्या पाण्याची या विक्रमी पुस्तकाच्या लेखकाची प्रकट मुलाखत व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल वानखेडे आणि पत्रकार अभिजित करंडे यांचे मार्गदर्शन होणार आहे.दुपारच्या भोजनानंतर दोन ते चार या वेळेत महाराष्ट्र धर्म काय शिकवतो? या विषयावर ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांचे मार्गदर्शन व गांधीजींच्या स्वप्नातील भारत या विषयावर निर्भीड पत्रकार निरंजन टकले सरांचे व्याख्यान होणार आहे यावेळी प्रसिद्ध लेखक चंद्रकांत झटले झटाले यांची उपस्थिती राहणार आहे.सायंकाळी चार ते पाच या चौथ्या सत्रात भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही या विषयावर ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराज यांचे मौल्यवान व्याख्यान होईल यावेळी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सोळुंके यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.मराठा बहुजन समाजातील तरुण उद्योजक व्यवसायात सक्षमपणे उभा राहून जगभरातील उद्योग व्यवसाय मराठी तरुणाने हस्तगत करावे म्हणून अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून समारोपीय कार्यक्रमात महाराष्ट्रातील स्वकर्तृत्वावर कृषी उद्योग व्यवसायात भरारी घेतलेल्या यशस्वी मराठी व्यवसायिकांना विश्वभूषण पुरस्कार दिला जाणार आहे.

हा विश्वभूषण पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मचे एमडी विलास शिंदे,एडीटी ग्रुप बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार व सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मगर यांना दिला जाणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा शाही सन्मान केला जाणार आहे.या अधिवेशनास पिंपरी चिंचवड शहरातून जास्तीत जास्त संख्येने वाशी मुंबई येथे उपस्थित राहाण्याचे आवाहन सतीश काळे यांनी केले आहे.