नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

0
285

मुंबई ,दि. १० (पीसीबी) – सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं आहे. याचा मोठा फटका हा ठाकरे गटाला बसला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि शिंदे गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून चिन्हासाठी तीन तर नावासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकाच चिन्हावर दोन्ही गटाने दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह अखेर गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता या चिन्हाचा दोन्ही गटाला वापर करता येणार नाहीये. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानं ठाकरे समर्थक आक्रमक झाल्याचं पहायाला मिळत आहे. पुण्यात जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे.