नवीन आयुक्तांचे सीमा सावळे, आशा शेंडगे यांच्याकडून स्वागत

0
339

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी स्वागत केले. शहरातील समस्या तसेच नेमके उपाय आदी मुद्यांवर चर्चा झाली. चांंगल्या कामात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन सावळे आणि शेंडगे यांनी दिले, मात्र कुठे चुकिचे काम असेल तिथे तितकाच प्रखर विरोध असतो, असेही त्यांनी सांगितले. आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासन अधिक गतीमान करण्याचे आश्वासन यावेळी दिले.