नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणात ५०० जणांवर गुन्हा दाखल

0
581

पुणे, दि. १ (पीसीबी) – मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. काल पुण्यात मराठा आंदोलकांनी मोठी जाळपोळ केली. या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जवळजवळ ४०० ते ५०० जणांवर सिंहगड रोड पोलिस स्थानकात गुन्ह्यांची नोंद केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी काल नवले पुलावर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं.
आंदोलनावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली होती. संपुर्ण रस्ता रोखण्यात आला होता. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण जाली होती. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आणि गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्थानकात गुन्ह्यांची नोंद केली जात आहे.
पुण्यातील नवले पुल जाळपोळ प्रकरणात ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम ३३६ आणि कलम ४४१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असताना काल (मंगळवारी) या आंदोलनाचे पडसाद पुणे शहरातही उमटले. शहराच्या वेगवेगळ्या भागात मंगळवारी आरक्षणाची मागणी व मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, विविध समाज घटकांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

पुणे-बंगळूर महामार्गावरील वडगाव पूल येथे आंदोलकांनी महामार्गावर टायरची जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती, त्याचा सर्वाधिक फटका रूग्ण, प्रवासी, नोकरदारांसह शालेय विद्यार्थ्यांना फटका बसला.