नवरा बायकोमध्‍ये भांडण लावते म्हणत जावयाचा सासूवर खुनी हल्‍ला

0
84

दिघी, दि. 24 (पीसीबी) : आमच्‍या नवरा बायकोमध्‍ये भांडणे लावतेस असे म्‍हणत जावयाने सासूवर खुनी हल्‍ला केला. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास चर्‍होली ते निरगुडी या रस्‍त्‍यावर घडली.

राधाबाई सावळे (वय 55) असे खुनी हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या सासूचे नाव आहे. याप्रकरणी राधाबाई यांच्या मुलीने (वय 34) दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. रामचंद्र आश्रुबा गोरे (रा. साठेवस्‍ती, लोहगाव, पुणे) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपली आई राधाबाई यांच्‍यासह लोहगाव येथे भरणार्‍या बाजाराकरिता चर्‍होली ते निरगुडी रस्‍त्‍याने चालल्या होत्‍या. त्‍यावेळी रस्‍त्‍याच्‍या कडेला थांबलेला फिर्यादी महिलेचा पती तिथे आला. त्‍याने फिर्यादी यांच्‍या आईला म्‍हणाला की, तू आमच्‍या नवरा बायकोमध्‍ये भांडण लावतेस. असे म्‍हणत त्‍याने रस्‍त्‍याच्‍या कडेला पडलेला दगड उचलून फिर्यादीची आई राधाबाई यांना जिवे मारण्‍याच्‍या उद्‌देशाने डोक्‍यात मारून गंभीर दुखापत केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.