सोलापूर, दि. ६ (पीसीबी) -सोलापुरात हिंदूंचा पवित्र सण श्रीजगदंबा नवरात्र महोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या नवरात्र उत्सवामध्ये काहीजण गरबा दांडियाचे आयोजन करतात. काही आयोजक हे मुसलमान असून त्यामध्ये ते आपल्या हिंदू मुलींना बोलवून मुस्लिम मुलासोबत गरबा खेळायला लावतात. लव्ह जिहाद यासारख्या षडयंत्राला हिंदुं मुली बळी पडतात. त्यामुळे मुस्लिम आयोजकावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.
मुस्लिम लोकांना मूर्ती पूजा मान्यच नाही. टिळा पद्धत मान्यच नाहीये तर त्यांनी कशासाठी गरब्याची व दांडियाचे आयोजन करतात. त्यांना एवढी जर आवड असेल तर दुर्गा दौडचे आयोजन करावे. दिवाळीला वसुबारस म्हणजे गाईची पूजा करावी, तरच आम्ही समजू सर्वधर्मसमभाव असे ते मानतात. ते नेमकेच जेथे आमच्या मुली स्त्रिया साठी आयोजन केल्यास तर तिथे ते गरबा दांडियासाठी आवर्जून उपस्थिती दाखवितात, हे सर्व संशयीत आहेत. लव्ह जिहादला मुलींना बळी पडतात, असे सोलापुरातुन अनेक मुली अजून सुद्धा गायब आहेत. पोलिसांमध्ये याची नोंद आहे. त्यासाठी हिंदू महासभेकडून कडकडीत विरोध करण्यात आला आयोजकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गरबा दांडियाचे हिंदू आयोजन करणार असेल तरी सुद्धा तेथे मुस्लिमना प्रवेश बंदी करावी,असे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आले. याप्रसंगी हिंदु महासभा सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे; विशाल पवार, सचिन करजगी, विनायक पाटील,आदर्श माने चंदु रोगे,केदार धोत्रे अविनाश हजारे यांची प्रमुख उपस्थिती होते.