नवरदेवाची चुकीचे जन्मतारीख दाखवून केली वधु पित्याची फसवणूक, तिघा विरोधात गुन्हा दाखल

0
93

आळंदी, दि. 12 जुलै (पीसीबी) – लग्न.कार्यावेळी नवरदेवाची जन्मतारीख व कागदपत्रे खोटे देऊन वधू पित्याचे फसवणूक करण्यात आली आहे. यावरून वधू पित्याने थेट पोलीस ठाण्यामध्ये मुलीसह तिच्या नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा सारा प्रकार आळंदी येथील फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज येथे रविवारी (दि.7) उघडकीस आला.

याप्रकरणी 59 वर्षीय वधू पित्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी सागर तात्याबा सरवदे (वय 20 रा. कोयाळी खेड) 20 वर्षीय महिला व फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज आळंदी चे मुकुंद वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सागर व महिला यांनी लग्नाच्या वेळी सागर याच्या जन्म तारखेत खाडाखोड केली. तसेच खोटे कागदपत्र देऊन 7 जुलै ला लग्न केले. मात्र जन्म तारखे मध्ये घोळ असताना देखील फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज यांचे मालक यांनी कोणतीही खातरजमा न करता मुलांची लग्न लावून दिली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.