नवनीत राणाने काढली थेट उध्दव ठाकरेंची लायकी

0
3

अमरावती, दि. 1३ (पीसीबी) : ”बांगलादेशमध्ये अन्याय झाला, त्या मोर्चांमध्ये ठाकरे कुठे होते? आमच्यावर कारवाई केली तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? आम्ही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही, ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी नाही. उद्धव ठाकरे हे टोमणा देणारे जनाब आहेत”, असं म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

त्याचदरम्यान, ”ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितलं आहे. बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटवरुन (एक्स) उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
”मुंबईमधील दादरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ गेल्या ८० वर्षांपासून असलेल्या श्री.हनुमानाचं मंदिर पाडण्याची नोटीस भाजपने पाठवली आहे. विशेष बाब म्हणजे ते मंदिर एका हमालाने मेहनत करुन बांधलं आहे. ती पाठवलेली नोटीस माझ्याकडे आहे. त्या नोटीसीमध्ये लिहिलंय की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलंय, ८० वर्षापूर्वीचं मंदिर भाजप पाडायला निघाले आहे. मग भाजपचं हिंदुत्व कुठे आहे?” असा सवाल करत ठाकरेंनी यावेळी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं.