नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह विभागप्रमुखांकडून घेताहेत इत्यंभूत माहिती

0
168

पिंपरी, दि. २४ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेखर सिंह हे महापालिकेतील विविध विभागामध्ये सध्यस्थितीत काय कामकाज सुरू आहे, कोणते नवीन प्रकल्प राबविले जात आहेत. संबंधित विभागांमार्फत भविष्यात काय नवीन करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती घेत आहेत. त्यामुळे सर्वच विभागाचे प्रमुख विभागातील इत्यंभूत माहिती गोळा करून आयुक्तांसमोर पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहेत.

पिंपरी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची 16 ऑगस्ट रोजी मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी सिंह यांची पिंपरी पालिका आयुक्तपदी राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यांनी (दि.18) ऑगस्ट रोजी आयुक्त आणि प्रशासक पदाचा पदभार स्विकारला. सिंह यांनी यापुर्वी नगरपरिषदांमध्ये आणि जिल्हाधिकारी म्हणून ग्रामीण भागात कामकाज केले आहे.

शहरी भागात आणि विशेषतः महापालिका आयुक्त म्हणून सिंह यांची पहिलीच नियुक्ती आहे. त्यामुळे सिंह यांनी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांबरोबर संवाद सुरू केला आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये काय कामकाज सुरू आहे, सद्यस्थितीत कोणते प्रकल्प राबविले जात आहेत, संबंधित विभागांमार्फत भविष्यात नवीन काय करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती सिंह घेत आहेत.