नवनाथ जगताप यांचे भाजपमध्ये जोरदर स्वागत

0
16


पिंपरी, दि. २० – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकेकाळी खंदे समर्थक असलेल्या माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचे स्वगृही भाजपमध्य़े जोरदार स्वागत झाले. दोन टर्म नगरसेवक राहिलेले नवनाथ जगताप हे नवी सांगवी, पिंपळे गुरव आणि परिसरातील युवकांमधील अत्यंत लोकप्रिय असे नेतृत्व. २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ३१ मधून ते अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळी त्याच प्रभाग ३१ (ड) मधून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जाते.
महापालिका शिक्षण मंडळ सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जगताप यांच्या भाजप प्रवेशाने या प्रभागातील भाजपचे पॅनल अधिक ताकदिचे झाले, असे मानले जाते.
पिंपरी चिंचवड शहरातील १७ माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी नेते विनोद नढे यांच्यासह नवनाथ जगताप यांचेही जोरदार स्वागत झाले.