दि.१९(पीसीबी)-नर्मदा मैयाच्या जयंतीनिमित्त नर्मदे हर संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात नर्मदा पुराण सप्ताह व नर्मदा यागाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कथा प्रवक्ते वेदमूर्ती प्रणव धानोरकर गुरुजी हे नर्मदा कथा कथन करणार आहेत. नर्मदा पुराणाचा हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील होत असल्याने जास्तीत जास्त नर्मदा भक्त व श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नर्मदे हर संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले आहे.
21 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम गोशाळेमध्ये सायंकाळी 4 ते 7 दरम्यान होणार आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी नर्मदा जयंतीनिमित्त कन्यापूजन, नर्मदा पूजन व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक घरात नर्मदा या संकल्पनेनुसार उपस्थित सर्व नर्मदा भक्तांना नर्मदा जल असलेली छोटी कुपी वाटप करण्यात येणार आहे. नर्मदे हर संघात नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करणारे अनेक ज्येष्ठ परिक्रमा वासी सदस्य आहेत. या कार्यक्रमास मुंबई, ठाणे, धुळे ,संभाजीनगर, नासिक, अहिल्यानगर, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील नर्मदा परिक्रमावासी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नर्मदे हर संघाचे संदीप शिंदे,रविंद्रनाना भिसे, रविंद्र मुळे, रविंद्र कोंढरे, सुदाम वाणी, विठ्ठल लोहार , संतोष कदम,अपर्णा बोरकर, अरुणा रामेकर, दिपाली नेहरे इत्यादी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.











































