दि . २५ ( पीसीबी ) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रमुख मेधा पाटकर यांना गुजरातमधील एका अब्रू नुकसानीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने 2024 मध्ये मेधा पाटकरांना पाच महिन्यांच्या तुरुंगवास ठोठावला होता.
सोबतच त्यांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई व्ही. के. सक्सेना यांना देण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते. सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.
सक्सेना यांच्या जाहिरातीविरोधात पाटकरांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या पत्रकात त्यांनी सक्सेना यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याची तक्रार सक्सेना यांनी पोलिसात केली होती. त्यानंतर अहमदाबादच्या एका कोर्टात 2001 साली हे प्रकरण आलं, त्यानंतर हे प्रकरण दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं. त्याचा निकाल 1 जुलै 2024 रोजी लागला. या वेळी स्थानिक प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राघव शर्मा म्हणाले की, त्यांचं वय आणि तब्येत पाहता त्यांना एक ते दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येत नाही.