नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकण्याची येत्या शनिवारी संधी

0
135

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : आपल्या धर्मशास्त्र परंपरेत स्कंदपुराणात नर्मदा परिक्रमेला खूप मोठे महत्व आहे. तब्बल २६०० किलोमीटरची ही परिक्रमा अवघ्या सात महिन्यांत अनवाणी पायी चालत महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता प्रविणजी लडकत यांनी सहकुटुंब नुकतीच पूर्ण केली. परिक्रमेतील सर्व अनुभवांची ही शिदोरी ते सर्वांसाठी खुली करणार आहेत. शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क सभागृहात त्यांच्याच तोंडून हे अनुभव ऐकण्याची पर्वणी सर्वांना मिळणार आहे.

जलदिंडी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सिटीझन फोरम ऑफ पिंपरी चिंचवड या संस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा आहे, परंतु त्यातील बहुतांश नदी मध्य प्रदेशातच वाहते. हे मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र अमरकंटक येथून उगम पावते आणि नेमावर नगरमध्ये तिचे नाभिस्थान आहे. नंतर ओंकारेश्वरातून पुढे जाऊन ही नदी गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंभातच्या आखातात विलीन होते. नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत. हिंदू पुराणात तिला रेवा नदी म्हणतात. त्याची परिक्रमा अत्यंत महत्त्वाची आहे.
अशी ही परिक्रमा महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता आणि आपणा सर्वांचे सहकारी प्रवीणजी लडकत यांनी नुकतीच पूर्ण केली. सलग सात महिने अनवाणी पायी चालत, उन-पावसाची पर्वा न करता अथक प्रयत्नांतून पूर्ण केली आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. या परिक्रमेचा अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी सर्वांसाठी असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.