नरेंद्र मोदी करणार तरुणांची दिवाळी गोड

0
206

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या तोंडावर देशाभरातील तरुणांसाठी मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. सध्या तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून आहे. त्यामुळे तरुणांसाठी लवकरच जॉब मेळा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळणार आहे.

22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 75,000 तरुणांना नोकरी प्रमाणपत्र वाटप करणार आहे. त्यामुळे तरुणांची दिवाळी गोड होणार आहे. सरकार या तरुणांना नोकरी देणार आहे.

एवढंच नाही तर, 10 लाख तरुणांना नोकरी देण्यासाठी पंतप्रधान रोजगार मेळा (Rojgar Mela) सुरु करणार आहेत. या मेळ्यात देशातील विविध मंत्रालय, विभाग आणि संघटनामधील अधिकारी उपस्थित असतील.

या विभागातील रिक्त जागांसाठी योग्य आणि गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. योग्य शैक्षणिक आर्हता असणाऱ्या तरुणांचा यामध्ये समावेश असेल. नोकरीची संधी हुडकणाऱ्या तरुणांसाठी ही जोरदार संधी असणार आहे.

तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी झाडून सर्व विभाग दिमतीला लागले आहे. तरुणांना थेट रोजगार देण्यासाठी केंद्र सरकराचे हे मोठे पाऊल मानण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या निर्देशानंतर सर्व मंत्रालय आणि विभाग युद्धस्तरावर रिक्त जागांसाठी कामाला लागले आहेत.

रिक्त जागा भरण्यासाठी त्याची यादी तयार करण्यात आली आहे. विभागवार यादी तयार करण्यात येत आहे. या रोजगार मेळ्यात देशातील 38 मंत्रालयांमधील ग्रुप A, B आणि C मधील पद भरती करतील.

22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या रोजगार मेळ्याचे उद्धघाटन होणार ाहे. यामध्ये केंद्रीय आर्म्ड फोर्स पर्सनल म्हणजेच CAFP मध्ये इन्स्पेक्टर, कॉ़न्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनो, पीए, प्राप्तिकर अधिकारी आणि मल्टी टास्क स्टाफची भरती होईल.