नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर बोलू नये म्हणून दादांनी केली विनंती..?

0
74

अहमदनगर,दि. १० ऑगस्ट (पीसीबी) – राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता अजित पवारांनी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचे वक्तव्य फेटाळले असून शरद पवारांवर बोलू नका अशी विनंती अजित पवारांनी मोदींना केल्याच्या चर्चांना देखील अजित पवार यांनी नकार दिला आहे.अजित पवार म्हणाले, मी असं काही बोललो नाही. मी असे काही बोलल्याचा व्हिडीओ दाखवा. मागे देखील असच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरूपी बनून दिल्लीला जात होतो. मी त्यांना म्हणालो की सीसीटिव्ही व्हीडीओ दाखवा. पण त्यांनी पुरावा दिला नाही. आम्हाला राज्यांत फटका बसला कारण संविधान मुद्दा, अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचा फटका आम्हाला बसला आहे.

आर्थिक शिस्त पाळणाऱ्या दादांनी एवढ्या योजनांना पैसा कसा दिला? यावर अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे. राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटी रुपये आहे. या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं. जे आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसारच केली आहे. आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले असून अर्थिक स्त्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे. जीएसटी उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीने वाढलं आहे. केंद्रातून देखील जास्तीत जास्त निधी आम्ही आणत आहोत. टॉयोटो किर्लोस्कर, जिंदाल अशा कंपनींचे 40 हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येत आहेत. अशा प्रकारची आर्थिक व्यवस्था आम्ही केली आहे. तरी देखील विरोधक आम्हाला चुनावी जुमला म्हणत आहेत.

माझी याबाबत नो कॉमेंट्स..: अजित पवार

परमबीर सिंह यांनी अनील देशमुख, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले कि मी माझं मन पक्क केलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठलेही प्रश्न विचारले तरी मी विकासावर बोलणार आहे. मला अशा प्रश्ननांच्या खोलात जाणार नाही, कारण केवळ आरोप प्रत्यारोप होतात. फार काही त्यातून हाती येत नाही. त्यामुळे माझी याबाबत नो कॉमेंट्स. असे पवार म्हणाले.