नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून लावण्याची धमकी

0
464

पुणे, दि. ९ (पीसीबी) – भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक मेसेज आला. त्यामध्ये असा धमकी देणारा मजकूर होता. सोशल माध्यमांवर विदेशातून मेसेज करत एका व्यक्तीनं ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम या नावानं जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीनं मेसेज केला आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.