नरेंद्र मोदींच्या काळात केंद्रीय संस्था झाल्या भ्रष्टाचाराचे कुरण : रविकांत वरपे

0
232

– सेंट्रल विजिलन्स कमिशन कडून अहवाल सादर

 पिंपरी, दि. १ (पीसीबी) – अमृत महोत्सव स्वातंत्रदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट्राचार मुळापासून संपवावा लागेल असे म्हंटले होते. मात्र याच नरेंद्र मोदीच्या काळात सेंट्रल विजिलन्स कमिशनने केंद्रीय संस्थांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आकडेवारी समोर आणली आहे. ज्यात त्यांनी म्हंटल आहे की ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय संस्था आहेत, यांच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. आपल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, या संविधानिक संस्थांचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दुरुपयोग केला आहे. या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सरकार कडून करण्यात येत आहे.

पण याच नरेंद्र मोदी सरकारने या संस्थांच्या अधिकाऱ्याना भ्रष्टाचारासाठी समर्थन केले आहे, हे या सेंट्रल विजिलन्स च्या अहवालातून दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात १७१ प्रकरणामध्ये तब्बल ६३३ केंद्रीय कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यात प्रकरणात ७५ प्रकरणात अनेक अधिकारी हे सीबीआय चे आहेत. ६५ प्रकरणात ३२५ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील ६७ आधिकारी यांचे १२ प्रकरण प्रलबित आहेत. रेल्वे मंत्रालयातील ३० अधिकाऱ्यांशी संबधित ११ अधिकाऱ्यावर आरोप आहेत. २०२१ मध्ये या संस्थांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नरेंद्र मोदींच्या काळात केंद्रीय संस्था झाल्या भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत.