दि . 28 – स्वारगेट एसटी स्थानकातील बंद शिवशाही बसमध्ये युवतीवर बलात्कार करणारा नराधम सराईत गुन्हेगार दत्त गाडे याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसाची पंधरा पथके त्याचा शोध घेत होती. शिरूर तालुक्यातील गणेगाव पारसरातील उसाच्या शेतात तो लपला होता. त्याच्या तपासावर लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
गुन्हा करून तो गावाकडे गेला आणि साळसूदपणे कीर्तन ऐकत बसल्याचे गावातील नागरिकांनी पोलिसांना कळविले. 100 पोलिसाचे पथकाने गावाला वेढा दिला आणि रात्रभर शोध घेतला.
ड्रोन आणि श्वानाने त्याचा नेमका ठावठिकाणा दाखवला. उसाच्या शेतात पोलिसाचा ताफा पोचला आणि खोलवर तपास केल्यावर तो सापडला. सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करणार असल्याचे समजले.