नराधमां तब्बल ४२ महिलांची हत्या

0
150

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – केनियाची राजधानी नैरोबीमध्ये एका नराधमां तब्बल ४२ महिलांची हत्या केली. त्यानं त्याच्या पत्नीचा देखील अत्यंत क्रूरपणे खून केला. सर्व मृतदेह त्याने पोलिस ठाण्याजवळ फेकून दिले.
केनियाची राजधानी नैरोबीमध्ये एका विक्षिप्त सीरियल किलरनं तब्बल ४२ महिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यानं त्याच्या पत्नीची देखील हत्या केली. पोलिसांना त्याच्या घरातून अनेक धक्कादायक गोष्टी देखील सापडल्या असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानं दिलेल्या कबुली जबाबातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी पुढे आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार लोक कॉलिन्स जुमासी खालुशा असे आरोपीचे नाव असून त्याला ‘व्हॅम्पायर’ नावानं ओळखलं जातं. ३३ वर्षीय या आरोपीनं आतापर्यंत त्याच्या पत्नीसह ४२ महिलांची हत्या केली आहे. खून केल्यानंतर तो महिलांच्या मृतदेहाची विटंबना करायचा. त्या नंतर नायलॉनच्या गोणीत बांधायचा. व मृतदेह नैरोबी येथील पोलीस ठाण्याजवळील झोपडपट्टीत जाऊन फेकायचा. झडतीदरम्यान त्याच्या घरात बंका, रबरी हातमोजे, सेलोटेप आणि प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या.

केनियामध्ये सध्या लिंग-आधारित हिंसाचार आणि राजकीय अनागोंदी दरम्यान, सिरियल किलींगची ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकारवर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी सरकार या प्रकरणाला महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नैरोबीमधील झोपडपट्टीत ९ सांगाडे सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्थानिक लोक येथे कचरा टाकत असत. खालुशा त्यात मृतदेह टाकायचा. खालुशाने महिलांना विविध आमिष दाखवून त्यांची हत्या करून फेकून दिल्याची कबुली दिली.

आरोपी खालुशाने त्याचा गुन्हा कबूल केल्या असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आले. त्याने २०२२ पासून त्याच्या पत्नीसह ४२ महिलांची हत्या केली आहे. खालुशाच्या घरातून पोलिसांना अनेक मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. नायलॉनच्या गोण्या सापडल्या. खालुशाने केलेल्या खुनांमध्ये एका २६ वर्षीय जोसेफिन ओविनोचा नामक महिलेचा समावेश आहे. आरोपीने तिला फोन केला. यानंतर ती ती बेपत्ता झाली. तिची बहीण पॅरिस किया हिने तिचा शोध सुरू केला आणि नंतर कळले की तिचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आला होता.