नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी अचानक विजेचा धक्का लागून १६ जणांचा मृत्यू

0
301

उत्तराखंडच्या चमोलीत अलकनंदा नदीच्या काठावरची दुर्घटना

डेहराडून,दि.२०(पीसीबी) – उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी बुधवारी अचानक विजेचा धक्का लागून १६ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत.

उत्तराखंडमधील चमोली येथे बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. चमोली मार्केटजवळ अलकनंदा नदीच्या काठावरील नमामि गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी अचानक विद्युत प्रवाह पसरला. अनेक लोक गंभीररीत्या भाजले आहेत. पिपळकोटी चौकीचे प्रभारी प्रदीप रावत आणि होमगार्ड मुकंदीलाल यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

चमोलीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंद किशोर जोशी यांनी सांगितले की, आतापर्यंत १६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्यात ११ जण भाजले आहेत. त्यापैकी सहा जणांना एम्स ऋषिकेशमध्ये पाठवण्यात आले आहे. तेथे जिल्हा रुग्णालयात पाच जण दाखल आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमोली येथे झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘दुर्घटना खूपच दुःखद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतो.’